केंद्राचे नियम व अटी

१) केंद्राचे नाव नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहे .
अ) बायोडेटा अथवा केंद्राचा नोंदणी फॉर्म .
ब) पोस्टकार्ड साईज कलर फोटो .
क) जन्मकुंडलीची झेरॉक्स कॉपी .
२) आपल्या स्थळाबद्दलची खरी माहिती स्वहस्ताक्षरात तसेच संपूर्ण लिहणे हि प्रत्येक पालकाची नैतिक जबाबदारी आहे .
३) केंद्रात नाव नोंदणी करतेवेळी खालील प्रमाणे फी भरावी लागते .
अ) एक वर्षाच्या मुदतीसाठी सभासद नोंदणी शुल्क रु . १४०० /-(मासिक स्थळांची माहिती फोन / ई -मेल / पोस्ट / कुरियर व वेबसाईट).
४) सभासदांनी आपल्या स्थळाला मॅच होत असलेल्या स्थळांची निवड करून त्या स्थळांची नोंदणी क्रमांक केंद्रास कळवून स्थळाबद्दलची माहिती फोन / ई -मेल / पोस्ट द्वारे घ्यावी .
अ) सभासदांना एकावेळी योग्य असलेल्या १२ स्थळांची माहिती १० दिवसाच्या अंतरावर दिली जाईल . हि माहिती मागवताना आपले नावनोंदणी क्रमांक व संपूर्ण नाव सांगावे . ई-मेल द्वारा माहिती मागवताना आपला बायोडेटा मध्ये नमूद केलेल्या ई-मेल आयडीचाच वापर करावा .
ब) नाव नोंदणीनंतर आपल्या स्थळाची माहिती केंद्रातर्फे पुढील महिन्याचा मासिकात एकदाच प्रसिद्ध केली जाते .
५) निवडलेल्या स्थळाची माहिती योग्य रितीने नातेवाईक, मित्र परिवार इ. करून घ्यावी भावी आयुष्यात काही प्रश्न निर्माण झाल्यास केंद्र जबाबदार राहणार नाही .स्थळाची माहिती पारखण्याची जबाबदारी संपूर्ण सभासदांची आहे .
६) केंद्रातील स्थळासंबधित माहितीचा गैरवापर करू नये .
७) वरील प्रमाणे नियम व अटी नुसार केंद्रात नाव नोंदणी करावी